अधिक माहिती साठी – https://www.edutipsidea.com ला भेट द्या.
तुम्ही नवोदय प्रवेश परीक्षेला सामोरे जाताना काय करावे ? काय करू नये ? या संदर्भात जर माहिती शोधत आहात.
मग तुम्ही योग्य ठिकाणी आहात.
ही माहिती तुम्ही कोणत्याही भाषे मध्ये वाचू शकता, यासाठी सर्वात खालच्या बाजूला (डाव्या बाजूला) ट्रान्सलेट (Translate) चे बटन दिले आहे, त्यावर क्लिक करा आणि तुम्हाला ज्या भाषेमध्ये वाचायचे आहे, कृपया ती भाषा निवडा / You can read this information in any Language, there is a Translate button at the bottom (Left Side), Click on it and select the Language in which you want to read.
नवोदय प्रवेश परीक्षेला सामोरे जाताना काय करावे ? काय करू नये ? वाचा सविस्तर माहिती:-
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा – २०२३
परीक्षा दिनांक – २९ एप्रिल, २०२३
परीक्षेची वेळ – सकाळी 11:30 AM – 01:30 PM [रिपोर्टिंग वेळ:10:30 AM]
( दोन तास – म्हणजेच 120 मिनिटे )
प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
सर्वात आधी आपल्याला या परीक्षेसाठी मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा.. !!
एज्यु टिप्स आयडिया चे एकच मिशन – नवोदय ॲडमिशन – आमच्या वेबसाईट मध्ये आपले मनापासून स्वागत आहे.
1. जवाहर नवोदय विद्यालय हे प्रत्येक जिल्यामध्ये आहेत.
2. पूर्ण भारतामध्ये एकूण ६६१ नवोदय आहेत. जवाहर नवोदय विद्यालय हे स्वायत्त संस्था (Autonomous Organisation) आहे, शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकार (Under Ministry of Education Dept. of School Education & Literacy, Govt. of India).
3. भारत सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (१९८६) नुसार जवाहर नवोदय विद्यालय (JNVs) सुरू केले.
4. दर वर्षी वर्ग ६ वी च्या ऍडमिशन साठी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा घेतली जाते, ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा मानली जाते. या परीक्षेला UPSC परीक्षेचे पहिली पायरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
5. आपल्याला शांततेने पेपर सोडवणे अत्यंत महत्त्वाचे असते.
6. प्रत्येक विद्यार्थ्यांची एक महत्त्वाकांक्षा असते की आपली निवड जवाहर नवोदय विद्यालयामध्ये व्हावी हीच असते.
7. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षे मधून प्रत्येक जिल्ह्यासाठी 80 विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
8. या परीक्षा देण्यासाठी साठी ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करावे लागते आणि ज्या विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षे साठी ऑनलाईन आवेदन (online Registration) केले असेल त्यांनाच ही परीक्षा देता येते.
9. या परीक्षेला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडे प्रवेश पत्र (Admit Card / Hall Ticket) असणे आवश्यक असते.
10. प्रवेश पत्र (Admit Card) Download केले नसेल तर खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही डाऊनलोड करून घ्या आणि प्रिंट काढा.
https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard
11. नवोदय प्रवेश परीक्षेच्या सरावासाठी इंग्लिश आणि मराठी माध्यम मधील मागील २० वर्षाच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडविण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईट लिंक मध्ये उपलब्ध आहेत, कृपया खालील वेबसाईट लिंक वरून डाउनलोड करा आणि जास्त जास्त सराव करा.
परीक्षेला जाण्यापूर्वी कोणती तयारी करावी? सोबत काय काय घ्यावे?
1) Admit Card (हॉल टिकीट)
2) Black / Blue Ball Pen. (दोन पेन सोबत असावेत. पेन हे घरीच एकदा चालवून बघावे)
3) Adhar Card सोबत असावे.
4) उत्तर पत्रिके खाली धरायला Pad सोबत घ्यावे
5) साधी घड्याळ (Digital नसावी)
6) पेन्सिल
7) खोडरबर (Eraiser)
8) गिरमिट (Sharpner)
9) चष्मा लागलेला असेल तर तो सोबत घ्यावा.
10) पाणी बॉटल (ट्रान्स्परन्ट बॉटल असावी) आणि आपली बॉटल ही श्यक्यतोर टेबलवर ठेवू नये, ठेवल्यास झाकण घट्ट लावावे जेणेकरून पेपर वर पाणी सांडणार नाही.
11) हातरुमाल (handkerchief)
12) मास्क
परीक्षा हॉलमध्ये किती वाजता पोहोचावे?
विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेची वेळ हि सकाळी 11:30 ते 1:30 आहे. परंतु आपणास एक तास अगोदर म्हणजेच सकाळी 10:30 वाजता परीक्षा केंद्रावर पोहचणे आवश्यक आहे आणि पोचल्यावर आपला रोल नंबर कोणत्या रूम मध्ये आहे हे शोधून ठेवणे गरजेचे आहे.
परीक्षा हॉलमध्ये पोहोचल्यानंतर आपण आपल्या रोल नंबर प्रमाणे बसून घ्यावे.
नमुना OMR SHEET (उत्तरपत्रिका):-
Please join our Telegram Channel – https://t.me/edutipsidea
विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या सूचना:-
1. कोणत्याही उमेदवाराला कोणत्याही परिस्थितीत प्रवेशपत्रा शिवाय परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.
2. प्रवेशपत्रातील तपशील काळजीपूर्वक तपासा. त्रुटी असल्यास, ताबडतोब संबंधित JNV च्या मुख्याध्यापकांना ईमेलद्वारे कळवावे.
3. परीक्षा हॉलमध्ये सामान्य घड्याळ वगळता कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरणे / गॅझेट्स आणण्याची परवानगी नाही.
4. परीक्षा हॉल मध्ये प्रवेशपत्र आणि काळे / निळे बॉल पेन वगळता कोणतीही वस्तू सोबत ठेवू नका.
5. उमेदवाराने सकाळी 10:30 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर अहवाल देणे आवश्यक आहे.
6 उशीरा अहवाल आल्यास उमेदवाराला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.
7. परीक्षेचा एकूण कालावधी 2 तासांचा आहे (सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 पर्यंत). तथापि, उमेदवारांच्या संदर्भात विशेष गरजांसह (दिव्यांग), 40 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल. सकाळी 11.15 ते 11.30 पर्यंत सूचना वाचण्यासाठी 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे.
8. उत्तर देण्यापूर्वी, उमेदवाराने हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की प्रश्नपुस्तिकेमध्ये 1 ते 80 पर्यंत अनुक्रमे 80 प्रश्न आहेत. विसंगती असल्यास, उमेदवाराने प्रश्नपत्रिका बदलण्यासाठी तत्काळ या प्रकरणाची निरिक्षकाकडे तक्रार करा.
9. OMR शीटवर लिहिण्यासाठी निळा/काळा बॉल पॉइंट पेन वापरा. पेन्सिल वापरण्यास सक्त मनाई आहे.
10. प्रत्येक प्रश्नापाठोपाठ चार पर्यायी उत्तरे, A, B, C आणि D चिन्हांकित केली जातात. उमेदवाराने योग्य उत्तर निवडणे आणि संबंधित वर्तुळ गडद करणे आवश्यक आहे.
11. OMR उत्तरपत्रिकेवर निवडलेले उत्तर. निगेटिव्ह मार्किंग केले जाणार नाही.
12. प्रवेशपत्रात नमूद केल्याप्रमाणे परीक्षेच्या त्याच माध्यमाची प्रश्नपत्रिका दिली जाईल. प्रश्नपत्रिकेचे माध्यम बदलण्याची परवानगी नाही.
13. उमेदवाराने प्रत्येक विभागातील सर्व प्रश्नांचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येक विभागात स्वतंत्रपणे पात्र असणे आवश्यक आहे.
14. उमेदवारांनी ओएमआर शीटवर तसेच प्रश्नपत्रिकेवर रोल नंबर भरणे आवश्यक आहे.
15. एकदा चिन्हांकित केल्यानंतर उत्तरामध्ये कोणताही बदल करण्याची परवानगी नाही. उत्तरपत्रिकेवर ओव्हरराईटिंग, कटिंग आणि मिटवण्याची परवानगी नाही.
16. OMR शीटवर व्हाईटनर/करेक्शन फ्लुइड/इरेजर वापरण्यास परवानगी नाही. OMR शीटवर कोणतीही विचित्र खूण करू नका.
17. उमेदवाराने आधार कार्ड/शासकीय सोबत बाळगणे आवश्यक आहे. ओळख/निवासाची पडताळणी करण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र आणि प्रदान केलेल्या माहितीचे समर्थन करण्यासाठी जन्मतारखेचा कोणताही पुरावा.
18. उमेदवाराने दुपारी 01.30 वाजेपूर्वी आणि OMR उत्तरपत्रिका पर्यवेक्षकाकडे सोपविल्याशिवाय हॉल सोडू नये.
19. परीक्षेदरम्यान सहाय्य देताना किंवा प्राप्त करताना किंवा अनुचित मार्ग वापरताना आढळलेला कोणताही उमेदवार अपात्र ठरविला जाईल.
20. तोतयागिरीचा कोणताही प्रयत्न उमेदवारी अपात्र ठरेल.
21. निवडीनंतर JNVs मध्ये इयत्ता VI मध्ये प्रवेश घेताना पात्रता निकषांच्या पूर्ततेच्या अधीन राहून उमेदवाराला तात्पुरत्या परीक्षेसाठी उपस्थित राहण्याची परवानगी आहे.
22. संबंधित JNV मध्ये प्रवेशासाठी उमेदवाराची निवड विहित NVS निकषांनुसार आहे.
For more updates please visit – https://www.edutipsidea.com
पेपर सोडवताना घ्यावयाची काळजी:-
1. पेपर सोडवताना शक्यतो दिलेल्या क्रमानेच सोडवावा. जसे सर्वात अगोदर मानसिक (Mental Ability) क्षमता चाचणी – 40 प्रश्न, (Mathematics) गणित – 20 प्रश्न आणि (Language) भाषा – 20 प्रश्न.
2. मानसिक क्षमता चाचणीचे 40 प्रश्न सोडवताना 100% खात्री असलेले प्रश्न, त्याचे उत्तर प्रश्नपत्रिकेतील पर्यायांमध्ये अगोदर tick करून ठेवावे आणि नंतर लगेच OMR SHEET मध्ये (उत्तरपत्रिके मध्ये) त्याच प्रश्ना पुढे वर्तुळ पूर्णपणे रंगवावे.
3. एखादा प्रश्न अवघड जात असेल तर त्यात विचार करण्यामध्ये जास्त वेळ घालवू नये. तो प्रश्न शेवटी सोडवावा.
परीक्षेचे स्वरूप कसे राहील:–
परीक्षा हि सकाळी 11:30 ते दुपारी 01:30 पर्यंत दोन तासांची असेल आणि केवळ वस्तुनिष्ठ प्रश्नांसह 3 विभाग असतील. 80 प्रश्न राहतील एकूण १०० गुणांसाठी.
चाचणीचा प्रकार | एकूण प्रश्न | गुण | कालावधी |
मानसिक क्षमता चाचणी | 40 | 50 | 60 मिनिटे |
अंकगणित चाचणी | 20 | 25 | 30 मिनिटे |
भाषा चाचणी | 20 | 25 | 30 मिनिटे |
एकूण | 80 | 100 | 2 तास |
पेपर सोडवताना वेळेचे नियोजन कसे करावे?
1. मानसिक क्षमता चाचणीचे 40 प्रश्न सोडविण्यासाठी 40 मिनिटे द्यावीत.
2. गणित विषयाचे 20 प्रश्न सोडवताना एका प्रश्नाला दोन मिनिटे म्हणजेच वीस प्रश्नांसाठी 40 मिनिटे वेळ द्यावा आणि लगेच 100% खात्री वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरे OMR SHEET मध्ये रंगवावीत.
3. गणिताचे एक – दोन प्रश्न अवघड वाटत असतील तर शेवटच्या दहा मिनिटांमध्ये सोडवावेत.
4. भाषा विषयाचे 20 प्रश्न सोडवताना प्रत्येक उताऱ्याखालील प्रश्न आणि त्याचे पर्याय काळजीपूर्वक वाचून घ्यावेत आणि त्यानंतर उतारा वाचावा जेणेकरून आपण वाचलेल्या प्रश्नांची उत्तरे चटकन, अचूक आणि कमी वेळेत आपल्याला मिळतील.
5. भाषा विषयाचे 20 प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला 20 मिनिटे वेळ पुरेसा आहे असे मला वाटते.
6. या पद्धतीने पेपर सोडवत गेल्यास मानसिक क्षमता चाचणी साठी 40 मिनिटे वेळ, गणित साठी 40 मिनिटे वेळ, भाषा विषयासाठी 20 मिनिटे वेळ लागेल. (40+40+20=100 मिनिटे)
7. आपल्याकडे आणखी 20 मिनिटे शिल्लक असतील.
8. शिल्लक असलेल्या 20 मिनिटापैकी पहिल्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला अवघड वाटत असलेले किंवा शिल्लक राहिलेले प्रश्न सोडवून घ्यावेत आणि लगेच OMR SHEET मध्ये त्याची उत्तरे नोंदवावीत.
9. शेवटच्या 10 मिनिटां मध्ये आपली संपूर्ण उत्तर पत्रिका तपासून घ्यावी. रोल नंबर, नाव, कोणताही प्रश्न आणि त्याचे उत्तर रंगवायचे शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यावी.
10. शेवटी, परीक्षकाची स्वाक्षरी आणि आपली स्वाक्षरी तपासून OMR SHEET अर्थात उत्तर पत्रिका परीक्षकाकडे देऊन त्यांच्या सूचनेप्रमाणे वर्गाच्या बाहेर यावे.
नवोदय विद्यालया ची ॲक्टिविटी बघण्यासाठी खालील व्हिडिओ बघा:-
“What sculpture is to a block of marble, education is to the human soul.”
– Joseph Addison
मला आशा आहे की आपल्याला हा लेख आवडला असेल .
आपल्याला आवडल्यास किंवा आपल्याला उपयुक्त असल्यास इतरांना शेअर करा.
प्रिय वाचकांचे आभार..आनंदी रहा..कनेक्टेड रहा
All the best….!!